अजपा योग - साधना आणि सिद्धी

अजपा साधना ही शैव, दत्त, आणि नाथ संप्रदायातील एक महत्वाची साधना आहे. या साधनेचे विवरण करणारी आणि अजपा ध्यानाची प्राथमिक क्रिया शिकवणारी बिपीन जोशी यांची लेखमाला.

स्वागत - लेखमालेविषयी काही
भारतवर्षामध्ये हजारो वर्षांपासून ऋषी, मुनी, तपस्वी, योगी, संन्यासी, बैरागी शाश्वत सत्याचा शोध घेण्यात मग्न होत आलेले आहेत. या सर्व लोकांनी या जगाविषयीचे आणि शाश्वत सत्याविषयीचे आपापले मत निरनिराळ्या पद्धतीने मांडले आहे. अशा एकुण सहा विचारप्रवाहांना महत्वाचे मानले जाते. त्यांना षडदर्शने असे म्हटले जाते. ही षडदर्शने म्हणजे सांख्य, योग, वेदांत, मीमांसा, न्याय आणि वैशेषिक. षड्दर्शनांमधून मुख्यतः चार महत्वाचे प्रश्न हाताळलेले दिसतात.
योगमार्गाचे सुलभ विवरण
योग या शब्दाचा अर्थ मिलन घडणे वा जोडले जाणे असा आहे. अध्यात्मिक दृष्टीने पहाता आत्मा आणि परमात्मा, जीव आणि शिव, पिंड आणि ब्रह्मांड यांचे ऐक्य म्हणजे योग होय. पतंजली योगशास्त्रात योग या शब्दाची व्याख्या चित्तवृतींचा निरोध होणे अशी केलेली आहे. जेव्हा चित्तवृतींचा पुर्णपणे उपशम होतो तेव्हाच आत्मा आपल्या खर्‍या स्वरूपात स्थित होतो आणि जीव-शिव ऐक्याची अनुभुती साधकाला मिळते.
कुंडलिनी अर्थात मानवी पिंडातील सुप्त अध्यात्म शक्ती
योगशास्त्राप्रमाणे मानवी पिंडातील पंचवीस तत्वे कोणती ते आगोदरच जाणून घेतले आहे. परमशिवापासून ते पृथ्वीतत्वापर्यंत जे सृजन होते त्याला योगशास्त्रात प्रसव असे म्हणतात. सृजनाचे कार्य संपल्यावर ईश्वरी शक्तीला काहीच कार्य उरत नाही. पण म्हणून ती शक्ती लोप पावत नाही. ती शरीरातच सुप्त रूपाने वास करते. या सुप्त शक्तीला कुंडलिनी असे म्हणतात. कुंडलिनी बद्दल येथे थोडक्यात विवेचन करत आहे.
अजपा योग हा कुंडलिनी जागृतीचा राजमार्ग
अजपा साधना अत्यंत प्राचीन काळापासून भारतात चालत आली आहे. अजपा साधनेचा उल्लेख उपनिषदे, तंत्रे, पुराणे आणि अन्य अनेक योगग्रंथांत आढळतो. त्यांपैकी काही असे आहेत - योग चूडामणि उपनिषद, योग शिखा उपनिषद, हंसोपनिषद, विज्ञान भैरव तंत्र, कुलार्णव तंत्र, योगबीज, घेरंड संहिता, गोरक्षपद्धती, शिव पुराण, स्कन्द पुराण. इतकेच नाही तर भगवत गीतेमध्ये सुद्धा अजपा साधनेशी अगदी मिळतीजुळती साधना सांगितलेली दिसते.
अजपा योग साधकांसाठी काही सुचना
अजपा साधना ही सोपी, सुलभ असली तरी काही मुलभूत तत्वे पाळली तर साधना अधिक चांगली होते आणि प्रगती वेगाने शक्य होते. अशाच काही उपयोगी सुचना आणि नियम.

लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे संगणक सल्लागार, लेखक आणि योग मार्गदर्शक आहेत. त्यांची संगणक विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकातींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. त्यांच्याकडून योग आणि ध्यान विषयक सशुल्क मार्गदर्शन प्राप्त करायचे असल्यास अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

हा मजकूर श्री. बिपीन जोशी यांच्या 'नाथ संकेंतींचा दंशु' या पुस्तकातून घेण्यात आला आहे. या लेखाचा उर्वरीत भाग वाचण्यासाठी आजच आपली प्रत विकत घ्या. अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.