देवाच्या डाव्या हाती - दुसरी आवृत्ती
|
लेखक : |
बिपीन जोशी |
पृष्ठे : |
109 |
आकार : |
5 इंच X 7 इंच |
किंमत : |
Rs.65/- (टपाल खर्च अतिरीक्त) |
|
पुस्तका विषयी...
कुंडलिनी योग अध्यात्म जीवनाचा राजमार्ग आहे. जगदंबा कुंडलिनीला जागृत करून
तीचे सहस्रार स्थित शिवाशी मिलन घडवून आणणे हे कुंडलिनी योगमार्गाचे
मुलतत्व. अनेकदा कुंडलिनी योग गूढतेच्या अनावश्यक धुक्याने वेढलेला आठळतो. हा
मार्ग फक्त जंगलात वा हिमालयात वास्तव्य करणार्या योग्यांसाठीच आहे असा गैरसमज
बहुतांशी लोकांमधे आढळतो.
बिपीन जोशी हे Microsoft .NET या विषयातील संगणक
सल्लागार, संगणक प्रशिक्षक आणि लेखक आहेत. 'देवाच्या डाव्या हाती' या पुस्तकात
त्यांनी स्वतःचे कुंडलिनी योगमार्गावरील अनुभव विषद केले आहेत. एक नवखा साधक ते
योगी या प्रवासात त्यांना कोणत्या अडचणी आल्या, त्यांनी मोठ्या जिद्दीने हा
प्रवास कसा पार केला याचे प्रभावी वर्णन या पुस्तकात आढळते. सामान्यतः कुंडलिनी
योगावरील पुस्तकात लेखक प्राचीन ग्रंथांवरून बेतलेले ज्ञान प्रसारीत करताना
दिसतात. अशा पुस्तकांमधे प्रत्यक्ष लेखकाचा स्वानुभव प्रकट होताना क्वचितच
आढळतो. हे पुस्तक या बाबतीत अगदी वेगळे आहे. लेखकाने आपला योगमार्गावरचा प्रवास
वर्णन करतानाच नवीन साधकांसाठी बहुमूल्य मार्गदर्शनही केले आहे. तेही अत्यंत
सोप्या, सुलभ आणि प्रभावी भाषेत.
अनुक्रमणिका
- एक विचित्र घटना
- गुरुचा शोध
- मी नोकरी सोडतो
- त्र्यंबकेश्वरला दाखल
- कुंडलिनी
जागृती
- अद्भुत स्वप्न आणि दीक्षा
- मी परत येतो
- नवी साधना आणि उत्फुर्त क्रिया
- कर्मयोग आणि नोकरीला कायमचा रामराम
- योगारूढ
- साधक प्रश्नावली
पुस्तक विकत कसे घ्यावे?
हे पुस्तक खालील ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहे.
- मॅजेस्टिक बुक डेपो - राम मारुती मार्ग, ठाणे. दूरध्वनी
- (०२२) २५३७६८६५ / (०२२) २५४३०६५२
- मॅजेस्टिक बुक डेपो - सेनापति बापट मार्ग, दादर.
दूरध्वनी - (०२२) २४३०५९१४
- आयडियल बुक कंपनी - छबिलदास पथ, दादर (प.). दूरध्वनी - (०२२)
२४३०२१२६
वरील सुविधां विषयी अधिक माहिती किंवा चौकशी कृपया त्या त्या बुक डेपोकडे करावी.