योग - अध्यात्म

12345678910...Last
नवरात्री २०२४
खरंतर नवरात्रीच्या पहिल्या दिवशीच ही छोटेखानी पोस्ट लिहिण्याचा मानस होता पण काही साधकांकडून नवरात्र विशेष साधना करवून घेत असल्याने त्यांच्या शंकानिरसनासाठी वेळ द्यावा लागला. ह्या पोस्टचा विषय थोडासा वेगळा आहे. कोणत्याही श्लोकांचे किंवा ग्रंथाचे निरूपण वगैरे त्यात नाही. मला जे सांगायचे आहे ते संगळ्यांनाच कळेल असं नाही. ज्यांनी दीर्घकाळ साधना केलेली आहे आणि ज्यांचा साधनेचा पाया भक्कम तयार झालेला आहे त्यांना ते समजेल अशी आशा आहे.
Posted On : 04 Oct 2024
प्राणशक्ती जीवाला चेंडू प्रमाणे खेळवते
लेखमालेच्या मागील भागात आपण श्रीगोरक्षनाथांचे शरीरातील नाडीजाला संबंधीचे विचार जाणून घेतले. एकूण बहात्तर हजार नाड्या कंदस्थानातून उगम पाऊण शरीरातील विविध भागात जातात हे आपण माहीत करून घेतले. या नाड्यामधून प्राण ऊर्जा अव्याहतपणे वहात असते. त्या प्राण उर्जे विषयी आता गोरक्षनाथ महाराज काही सांगत आहेत.
Posted On : 30 Sep 2024
त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यम्
श्रीगणेशाचे आगमन होत आहे त्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. श्रीगणेश चतुर्थीचा मुहूर्त साधून तुमच्यापैकी अनेकजण विशेष साधना सुद्धा नक्की करणार आहेत. श्रीगजाननाचा कुंडलिनी योगाशी असलेला घनिष्ठ संबंध आणि अजपा जपाशी असलेले नाते आपण आज थोडक्यात जाणून घेणार आहोत.
Posted On : 06 Sep 2024
नाडी कंद आणि दश नाडी वर्णनम्
तुम्हा सगळ्या वाचक मंडळींची श्रावणातील उपासना जोमाने सुरू असणार अशी खात्री आहे. बराच काळ झाला गोरक्ष शतकावरील लेखमाला जरा बाजूला पडली होती. आज ती पुन्हा सुरू करूया. गोरक्षनाथ महाराज आता नाडी कंद आणि नाड्या यांच्या विषयी काही सांगणार आहेत. ते काय म्हणतात ते थोडक्यात पाहू.
Posted On : 19 Aug 2024
अजपा योगाचा रोडमॅप
नुकतीच श्रीगुरुपौर्णिमा होऊन गेली आहे. त्या निमित्ताने तुम्ही सगळ्यांनी बऱ्याच मार्गदर्शनपर गोष्टी वाचल्या, ऐकल्या, पाहिल्या असतील. कदाचित काही विशेष साधना सुद्धा केल्या असतील. त्यामुळे आज कोणतेही निरूपण किंवा क्लिष्ट श्लोक वगैरे घेत नाही.
Posted On : 29 Jul 2024
गुरुपौर्णिमा २०२४
आपल्या अशक्त आणि दुबळ्या मुलावर आई-वडील अधिक प्रेम करत असतात कारण त्यांना माहीत असतं की आपल्या शिवाय हा तग धरू शकणार नाही. माझ्या योगजीवनात भगवान महादेव बाबा आणि गौरा माईने मला अक्षरशः तशी माया दिलेली आहे.
Posted On : 21 Jul 2024
अनंतकोटीब्रह्मांडनायक
भारतवर्षात आजवर अनेक सत्पुरुष होऊन गेले. अध्यात्म जगतातील अनेक जण या सत्पुरुषांची भक्ती, उपासना करतांना आपल्याला दिसतात. यांतील काही सत्पुरुषांचे मठ, आश्रम, समाधी स्थळे वगैरे ठिकाणे सुद्धा अतिशय लोकप्रिय आणि सर्वज्ञात आहेत. या सत्पुरुषांच्या भक्तमंडळींच्या उपासनेत एक गोष्ट तुम्हाला हमखास आढळून येईल ती म्हणजे त्यांनी केलेला त्या-त्या सत्पुरुषाच्या नावाचा जयकार. कित्येकदा या जयकाराचे वाक्य सुद्धा त्या-त्या सत्पुरुषांच्या मठ-मंदिरांच्या भिंतींवर अंकित केलेले तुम्हाला आढळून येईल.
Posted On : 19 Jul 2024
शिव-पार्वती संवादरूपी श्रीगुरुगीता
गोरक्ष शतका वरील लेखमाला जरा थंडावली आहे. त्याला एक कारण आहे ते म्हणजे आगामी श्रीगुरुपौर्णिमा. माझ्या काही स्टुडंटस कडून मागील पौर्णिमा ते आगामी पौर्णिमा या कालखंडात काही साधना / उपासना करवून घेत आहे त्यामुळे त्यात व्यग्र आहे. आजचा हा लेख खरंतर अचानकच लिहायला घेतला. लेखात नक्की काय सांगायचे आहे हे देखील मनात जुळवलेले नाही. पाहूया श्रीगुरुमंडलाच्या इच्छेने लेखणीतून काय उतरतेय ते.
Posted On : 08 Jul 2024
देहातील कामरूप पीठ आणि कामाख्या देवी
मी मागील लेखात सांगितल्या प्रमाणे तुम्ही जर योग आणि तंत्र यांमधील परस्पर संबंध जाणत नसाल तर मग वरील श्लोक तुम्हाला नीटसासे कळणार नाही. त्यातील संकल्पना नीट उलगडणार नाहीत. कुंडलिनी योगाच्या बाबतीत हे रीडिंग बीटवीन द लाईन्स खूप महत्वाचे आहे कारण त्या शिवाय प्राचीन योगग्रंथ काय म्हणत आहेत ते नीट कळत नाही.
Posted On : 28 May 2024
सतीच्या देहाचे तुकडे आणि भगवान शिव प्रणीत दोन मार्ग
एकदा काही ऋषी-मुनींनी एका यज्ञाचे आयोजन केले होते. सर्व देवी-देवतांना आमंत्रण दिलेले होते. प्रजापति दक्ष सुद्धा यज्ञात उपस्थित रहाण्यासाठी आला होता. दक्ष आल्यावर त्याला मान देण्यासाठी सर्व देव उभे राहिले. भगवान शंकर मात्र आपल्या आसनं वरुण उठला नाही. या गोष्टीचा दक्षाला खूप राग आला. त्याने ही गोष्ट मनात धरून ठेवली.
Posted On : 06 May 2024
12345678910...Last