Advanced Ajapa Dhyana Yoga : Tap the power of breath, mantra, mudra, and meditation for improved focus, peace of mind, and blissful inner connection.


बिपीन जोशी लिखित नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकातील निवडक भाग वाचण्यासाठी येथे जा.


नाथ संकेतींचा दंशु

लेखक : बिपीन जोशी
पृष्ठे : १३०
आकार : ५ इंच X ७ इंच
किंमत : रुपये ६५/- मात्र (टपाल खर्च अतिरीक्त)

पुस्तका विषयी...

कुंडलिनी योगमार्ग विनाकारण गुढतेच्या आणि क्लिष्टतेच्या वलयात झाकोळला गेला आहे. सर्वसामान्य संसारी साधक कुंडलिनी योगमार्गापासून दूरच राहिला आहे. कुंडलिनी योगमार्गाच्या अनेक परंपरा आहेत. त्यांच्या साधनामार्गातही भिन्नता आहे. या सर्व पसार्‍यातून सर्वसामान्य साधकाला समजतील, जमतील आणि फायदा मिळवून देतील अशी मूलतत्वे आणि साधना यांचे सहज सोप्या भाषेत विश्लेषण करणे हे या पुस्तकाचे मुख्य उद्दीष्ट आहे. पुस्तक दोन भागात विभागलेले आहे. प्रत्येक भागात सात अशी एकूण चौदा प्रकरणे आहेत. पहिला भाग कुंडलिनी योगमार्गाची पार्श्वभूमी आणि मूलतत्वे विशद करतो तर दुसरा भाग अजपा आणि जप या साधनांचे विवरण करतो. कुंडलिनी, चक्रे, प्राण, नाड्या अशा योगशास्त्रीय संकल्पनांबरोबरच शैव दर्शन आणि शिव उपासना यांबद्दल माहितीही पुस्तकात समाविष्ट केलेली आहे.

अनुक्रमणिका

भाग १ : कुंडलिनी योग ~ संकल्पना आणि स्वरूप
१. नाथ संप्रदाय
२. अष्टांग योग
३. शिवयोग अर्थात शिव-शक्ति मिलन
४. पशू, पाश आणि पति
५. कुंडलिनी योग आणि गृहस्थाश्रम
६. कुंडलिनी, प्राण, नाड्या आणि चक्रे
७. शिवाचे ‘महाकाल’ स्वरूप

भाग २ : कुंडलिनी जागृती ~ साधना आणि सिद्धि
८. योग्यांचे यम आणि नियम
९. अजपा साधना
१०. अजपा साधनेद्वारा ‘महायोग’ प्राप्ती
११. जप साधना
१२. शिवलिंग, रुद्राक्ष आणि शिव मंत्र
१३. योगाभ्यासाला पोषक आणि हानिकारक गोष्टी
१४. योगी, सिद्ध आणि अवधूत

पुस्तक विकत कसे घ्यावे?

हे पुस्तक खालील ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहे.

  • मॅजेस्टिक बुक डेपो -  राम मारुती मार्ग, ठाणे. दूरध्वनी - (०२२) २५३७६८६५ / (०२२) २५४३०६५२

वरील सुविधां विषयी अधिक माहिती किंवा चौकशी कृपया त्या त्या बुक डेपोकडे करावी.