Advanced Ajapa Yoga Kriyas and Meditations : Tap the power of breath, mantra, mudra, and dhyana for improved focus, peace of mind, and blissful inner connection.


दिनविशेष -- जानेवारी २०२३

ध्यान साधना ही खरंतर दैनंदिन दिनचर्येचा भाग बनायला हवी. आजकालच्या धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनशैलीमुळे अनेक योगसाधकांना ही नियमितता पाळता येत नाही. हे लक्षात घेऊन महिन्यातील अजपा साधनेच्या दृष्टीने काही महत्वाचे दिवस खाली दिलेले आहेत. साधनेत अनियमितता असणाऱ्यांनी खालील दिवशी न चुकता, न कंटाळता अजपा ध्यानसाधना करण्याचा प्रयत्न करावा. नियमितपणे अजपा ध्यानसाधना करणाऱ्यांनी खालील दिवशी विशेष एकाग्रतापुर्वक साधना करण्याचा प्रयत्न करावा. सर्वाना ध्यान साधनेसाठी शुभेच्छा !!


दिनांक दिनविशेष सूर्योदय सूर्यास्त
प्रदोष 07:13 AM 06:13 PM
शाकंभरी पौर्णिमा 07:13 AM 06:15 PM
१४ कालाष्टमी 07:15 AM 06:20 PM
१९ प्रदोष 07:15 AM 06:23 PM
२० शिवरात्रि 07:15 AM 06:24 PM
२१ मौनी अमावास्या 07:15 AM 06:24 PM
२५ वसंत पंचमी, गणेश जयंती 07:14 AM 06:27 PM
२६ स्कंद षष्ठी 07:14 AM 06:27 PM
२८ रथसप्तमी 07:14 AM 06:29 PM
२९ दुर्गाष्टमी 07:13 AM 06:29 PM

श्वासोश्वास अहोरात्र घडत असल्याने अजपा ध्यानासाठी खरंतर कोणतीही वेळ शुभंच आहे परंतु ब्रह्ममुहूर्त आणि प्रदोष काल विशेष फलदायी आहेत. वरील सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळा तुम्हाला ब्रह्ममुहूर्त आणि प्रदोष काल यांची ढोबळमानाने कल्पना यावी यासाठी दिलेल्या आहेत. अचूक कालमापनासाठी आणि अन्य दिवसांच्या सूर्योदय-सूर्यास्ताच्या वेळांसाठी कृपया दिनदर्शिका किंवा पंचांगाचा आधार घ्यावा.



||  अजपा ध्यानाचा प्राथमिक विधी   ||  अजपा ध्यानाचा ऑनलाईन कोर्स  ||


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ सॉफ्टवेअर कन्सल्टंट, प्रशिक्षक, लेखक आणि योग-ध्यान मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. अजपा योग क्रिया आणि ध्यानाच्या ओंनलाईन सेशन्स विषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 31 December 2023