कुंडलिनीविषयी साधकांमधे एवढे गैरसमज असतात की त्या जंजाळामधे कुंडलिनीचे खरे
स्वरूप त्यांना कळतच नाही. अनेक पुस्तकांमधे लेखक प्राचीन योगग्रंथांमधले कुंडलिनी
आणि चक्रांचे वर्णन घोळवून घोळवून सांगत बसतात. प्राचीन ग्रंथ हे योग्यांसाठी
प्रमाण आहेत हे खरे, पण तुमच्या स्वत:च्या अनुभवाच्या जोरावर नवशिक्या साधकांसाठी
समजेल अशा भाषेत हे गूढ उकलायला नको का? असो.
येथे मी असे काही प्रश्न निवडले आहेत की जे नवख्या साधकाला नेहमी सतावतात आणि
ज्यांची उत्तरे योगग्रंथांत सहजासहजी सापडत नाहीत. यातील अनेक प्रश्न मला माझ्या
वेब साईटच्या वाचकांनी विचारलेले आहेत. अनेक तज्ञांनी या प्रश्नांची उत्तरे
आपापल्या परीने देण्याचा प्रयत्न केलेला आहे पण त्यांच्या उत्तरांमधे सर्वच बाबतीत
एकवाक्यता नाही. येथे देण्यात आलेली उत्तरे मी माझ्या अनुभवांच्या आधारे देत आहे.
ती इतर कोणी दिलेल्या उत्तरांशी जुळतीलच असे नाही. माझा तसा प्रयत्नही नाही. माझीच
उत्तरे बरोबर आहेत असे तुम्ही मानावे असाही माझा आग्रह नाही. माझ्या साधनेच्या व
स्वानुभवाच्या अनुषंगाने कुंडलिनी योगशास्त्राविषयी माझी काही ठाम मते आहेत. याच
मतांच्या आधाराने काही महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा हा प्रयत्न.
- कुंडलिनी म्हणजे काय?
- प्राण म्हणजे काय?
- कुंडलिनी व प्राण यांचा संबंध काय?
- कुंडलिनी जागृती म्हणजे काय?
- प्राणोत्थान व कुंडलिनी जागृती यांतील फरक काय?
- कुंडलिनी जागृती व आध्यात्मिक प्रगती यांतील संबंध काय?
- काही ग्रंथ चक्रे सहा आहेत असे सांगत्तात तर काहींच्या मते ती नऊ आहेत.
तुमचे काय मत आहे?
- मला कुंडलिनी योग शिकायचा आहे. कोणाकडून शिकू?
- कुंडलिनी जागरणासाठी कीती कालावधी लागतो?
- कुंडलिनी योगसाधना करण्यासाठी वय, लिंग यांच्या काही अटी आहेत का?
- कुंडलिनी जागरणासाठी ब्रह्मचर्य अत्यावश्यक आहे का?
- कुंडलिनी जागृतीनंतर सर्व रोग नष्ट होतात हे खरे आहे काय?
- कुंडलिनी जागरणानंतर सिद्धी प्राप्त होतात हे खरे आहे काय?
- कुंडलिनीचे अस्तित्व आधुनिक विज्ञानाद्वारे सिद्ध झाले आहे का?
- कुंडलिनी योगशास्त्रावरचे प्राचीन ग्रंथ वाचण्याची माझी इच्छा आहे. कोणते
ग्रंथ वाचू?
या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी श्री. बिपीन जोशी लिखित
देवाच्या डाव्या हाती या पुस्तकाची प्रत आजच विकत घ्या.
वरील निवडक मजकूर बिपीन जोशी यांच्या देवाच्या डाव्या हाती
या पुस्तकातून घेतलेला आहे. पुस्तकाचा उर्वरित भाग वाचण्यासाठी आपली प्रत आजच विकत घ्या.
अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.