कुंडलिनी योगमार्ग विनाकारण गुढतेच्या आणि क्लिष्टतेच्या वलयात झाकोळला गेला आहे.
सर्वसामान्य संसारी साधक कुंडलिनी योगमार्गापासून दूरच राहिला आहे.
सर्वसामान्य साधकाला समजतील, जमतील आणि फायदा मिळवून देतील अशी मूलतत्वे आणि साधना यांचे सहज सोप्या भाषेत विश्लेषण करणे हे या पुस्तकाचे मुख्य उद्दीष्ट आहे. अजपा योग, जप साधना, योग्यांचे यम-नियम, सुलभ शिवोपासना इत्यादी उपयुक्त गोष्टींसह प्रभावी आणि स्वानुभवाधिष्ठित मार्गदर्शन. संगणक सल्लागार, प्रशिक्षक आणि लेखक बिपीन जोशी यांच्या नाथ संकेतीचा दंशु या पुस्तकातून घेतलेले निवडक भाग. पुस्तकाचा उर्वरित भाग वाचण्यासाठी आपली प्रत आजच विकत घ्या. अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.